प्रेमाचा त्रिकोण (Premacha Trikon)

Here’s the full text extracted from the PDF you’re viewing:
प्रेमाचा त्रिकोण घरातच तयार होतो, किंबहुना मी तर असे म्हणेन की प्रत्येक कुटुंबात हा त्रिकोण असतोच, आणि असायलाही हवा. अशा लाडीक हट्टानेच तर घरपण टिकून राहातं नाही का?
मुलं बाळ असलेल्या आई-वडिलांना तर हा अनुभव आलाच असेल:
“बाळाने आईला हळुवार जरी हाक मारली तरी तू धावत पळत जातेस तिच्या जवळ, मी मात्र चार-पाच आवाज दिल्यावरसुद्धा नुसतं लांबून आले म्हणून अजून दहा मिनिटं उशीरा येतेस.”
हे असे शब्द अनेक पित्यांच्या कानावर आदळले असतील. पुरुषांच्या बाजूने विचार केला तर तो खरंच प्रेमाच्या त्रिकोणात दोघात तिसरा झालेला असतो. बाळसुद्धा आईच हवी म्हणून टाहो फोडत असतो. त्याला जगात आणणारा बाबा आता फक्त खेळणी किंवा खाऊ देणारा गडी झालेला असतो.
आई मात्र अजूनही क्वीन ऑफ हार्ट्स असते. यातही एक वेगळी मजा, एक वेगळं समाधान आहे. बरं, नवऱ्याची बाजू घेतली तर लगेच मुलं म्हणतात “तू बाबालाच जास्त प्रेम करतेस.” अशा गोड टोमण्यांनी मन एकदम भान हरपून जातं.
तसेच लांब राहणाऱ्या आईचा फोन कधी असेल तर वारंवार फोन लावून बघतोच ना? जणू काही ती फोनवरची बाई सांगणारे की तुमची आई कुणाशी बोलतेय ते. पण इथेही तेच—आईवरचं प्रेम म्हणून ती मला सोडून मोठ्या किंवा लहान भावंडाशी तर बोलत नाहीये ना याची रुखरुख असते.
जर ती खरंच दुसऱ्या भावंडाशी बोलत असेल तर मन थोडंसं खट्टू होतं. “तू तर माझ्याशी इतका वेळ बोलत नाहीस” म्हणून लटका रागही येतो आपल्याला. आमच्याकडे असे फोनवरून बरेच भांडणं झालेत म्हणून आता आईने प्रत्येकाला वेळ ठरवून दिली. उगाच सवे फुगे नकोत.
असे प्रेमाचे त्रिकोण आई व्यवस्थित हाताळू शकते. तसा त्या गोष्टीचा आईला फार अभिमान वाटतो की मुलं अजून आईला जोडून आहेत. अशाच छोट्या छोट्या भावनांनी कुटुंब एक बांधले जातं म्हणून हे असे प्रेमाचे त्रिकोण हवेहवेसे वाटतात.
तसेच कौटुंबिक प्रेमाच्या त्रिकोणाचे सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे सासू-सून आणि तिसरे नवरा नावाचे टोक. पिढ्यान् पिढ्या चालत आलेला आणि यात कधी स्वतःहून तर कधी बळजबरीने अडकलेला तमाम नवरा वर्गाचे मला खूप कौतुक आहे.
त्यांच्या आयुष्यात त्या अगदी जवळच्या दोन व्यक्तींच्या प्रेमावर अमाप प्रेम त्यांना पावलोपावली जाणवतं. “तुझी तर आई आईच करते हो”, नाहीतर “आता काय लाडाची बायकोच तुझी” म्हणून दोघीही टोकावर धरतात.
आता त्या प्रेमाचा त्याला आनंद आहे की त्रास हा त्याचा प्रश्न आहे. यात भरीत भर घरात कारभार आले म्हणजे झालंच. अशा वेळेला नवऱ्यांची धावपळ बघण्याची मजा कुठल्याही नावाजलेल्या रोमँटिक सिनेमात नाही.
हे असे मजेशीर आणि हवेहवेसे त्रिकोण घरात जरी असले तरी काही त्रिकोण अंगाशी येतात. कुठे रेशीमगाठी जुळतात तर कुठे रेशीम कमी पडतं. पण आज ना उद्या आपल्यावर प्रेम करणारं स्थान आयुष्यात येईल आणि मग असेच हसत खेळत कौटुंबिक प्रेमाचे त्रिकोण बनतील हे जाणून मनसोक्त आयुष्य जगावं.